Ad will apear here
Next
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ‘पेटीएम मनी’द्वारे शक्य
‘पेटीएम’द्वारे ‘युपीआय पेमेंट’ची सुविधा दाखल
मुंबई : आता म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना आपल्या दर महिन्याच्या एसआयपी किंवा एक रकमी गुंतवणूक ‘पेटीएम मनी’ अॅपच्या सहाय्याने करता येईल. या अॅपद्वारे आता युपीआय आधारित पेमेंटची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.      

याबाबत 'पेटीएम मनी'चे संचालक प्रवीण जाधव म्हणाले, 'सर्व प्रकारच्या ऑनलाइन व्यवहारांत युपीआय आधारित पेमेंटचा स्वीकार व्यापक स्तरावर होत आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनादेखील ‘पेटीएम मनी’मार्फत ही ‘युपीआय पेमेंट’ सुविधा देताना आम्हाला आनंद होत आहे. ही सुविधा अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. ‘पेटीएम मनी’ वरील गुंतवणूकदार ऑटो-पे मार्फत,१९० बँकांमधून ऑटोमेटेड ई-मॅन्डेट आणि नेट बँकिंगच्या माध्यमातून युपीआयसह एसआयपी आणि वन-टॅप गुंतवणूक करू शकतात.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा अनुभव अधिक चांगला आणि सुलभ करण्यासाठी ‘पेटीएम मनी’ आपले उत्पादन आणि टेक्नॉलॉजी यात नाविन्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने ३२ अॅसेट मॅनेजमेंट कंपन्याशी भागीदारी केली आहे. गुंतवणुकीची निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी कंपनीने मॉर्निंग स्टार, क्रिसिल आणि व्हॅल्यू रिसर्च या आघाडीच्या रेटिंग सेवांशीदेखील हातमिळवणी केली आहे.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZSCBV
Similar Posts
‘पेटीएम मनी’तर्फे आयकर बचतीसाठी ‘इन्व्हेस्टमेंट पॅक’ मुंबई : पेटीएम मनी या म्युचुअल फंड गुंतवणुकीसाठी असलेल्या मंचाने ग्राहकांना आयकर बचतीसाठी विशेष इन्व्हेस्टमेंट पॅक तयार केले आहेत. यात चार इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ईएलएसएस) म्युचुअल फंड आहेत व यांची गुंतवणूक दोन हजार रुपयांपासून सुरू होते.
‘पेटीएम’वर ‘म्युच्युअल फंड’चा निःशुल्क मागोवा मुंबई : पेटीएमचे वापरकर्ते आता त्यांच्या पेटीएम मनी अॅपवर त्यांच्या संपूर्ण म्युच्युअल फंड गुंतवणुकीची कामगिरी कोणत्याही शुल्काशिवाय पाहू शकणार असल्याची घोषणा नुकतीच ‘पेटीएम मनी’ने केली.
‘पेटीएम मनी’च्या चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरपदी सुरेश वासुदेवन मुंबई : पेटीएम मनी या म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीच्या ऑनलाइन मंचाने सुरेश वासुदेवन यांना आपले चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ) म्हणून नियुक्त केल्याचे जाहीर केले. सुरेश वासुदेवन पेटीएम मनीचा एकंदर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार सांभाळतील.
स्टॉक ब्रोकिंग सुरू करण्यासाठी ‘पेटीएम मनी’ला ‘सेबी’ची मंजुरी मुंबई : ‘पेटीएम मनी’ला आपल्या वापरकर्त्यांना स्टॉक ब्रोकिंग सेवा प्रदान करण्यासाठी सिक्योरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाची (सेबी) मंजुरी मिळाल्याचे ‘पेटीएम मनी’ने जाहीर केले. ‘पेटीएम मनी’च्या सदस्यत्वाला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजकडून (एनएसई) मंजुरी मिळाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language